Home विदर्भ बिरसी फाटा येथे राष्ट्रवादी काँग्रेसने केला रास्ता रोको आंदोलन

बिरसी फाटा येथे राष्ट्रवादी काँग्रेसने केला रास्ता रोको आंदोलन

0

गोंदिया,दि.१२ः- तिरोडा विधानसभा मतदारसंघातील व तालुक्यातील समस्या निकाली काढण्याच्या मागण्यांना घेऊन आज (दि.१२) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने तिरोडा तालुक्यातील बिरसी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार राजेंद्र जैन, माजी आमदार दिलीप बंसोड यांनी केले.आंदोलनात नरेश माहेश्वरी,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवनकर,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन,महिला राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर,तालुकाध्यक्ष प्रेमकुमार राहंगडाले,पंचायत समिती सभापती निता राहंगडाले,जिल्हा परिषद सदस्य व जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग मनोज डोंगरे यांच्यासह जिल्हा परिषद,पंचायत समितीचे सदस्य,नगरपरिषद सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.तहसिलदार संजय रामटेके यांनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलकांच्या मागण्याचे निवेदन स्विकारले.
हे आंदोलन तिरोडा तालुक्यातील तिरोडा ते तुमसर राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे बांधकाम कार्यकारी अभियंता व कंत्राटदारामुळे रखडले गेल्याने यांच्यावर कारवाई करण्यात यावे.तसेच रखडलेले काम जलदगतीने करुन येण्या-जाण्याचा मार्ग पुर्ववत करण्यात यावी.रस्ते खराब असल्यामुळे बंद करण्यात आलेल्या एस.टी. बसेस सेवेमुळे विद्याथ्र्यांचे नुकसान होत आहे,त्याकरीता बंद एस.टी तत्काळ सुरु करण्यात यावे.खरीब तसेच रब्बी धानाचे सरसकट बोनस शेतकèयांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात यावे.शेतीकरिता कुषी पंपासाठी विज पुरवठा करुण तत्काळ कँनेक्शन द्यावे.शेतीकरिता सोलर पंपची अट रद्द करण्यात यावी अशा मागण्यांसाठी करण्यात आले.

Exit mobile version