Home विदर्भ भेलावे परिवाराने आईच्या स्मृतिदिना निमित्त बेघर नागरिकानां केली मदत

भेलावे परिवाराने आईच्या स्मृतिदिना निमित्त बेघर नागरिकानां केली मदत

0

गोंदिया,दि.20:- आपल्या पूर्वजांचे अनन्य उपकार आपण फेडू शकत नाही पण त्यांच्या आठवणी हृदयात कायम राहावे व पूर्वजांच्या स्मृतिप्रित्यर्थ काहीतरी समाजहित कार्य आमच्या कडुन घड़ावे हा विचार करुन ओबीसी संघर्ष कृती समिति व ओबीसी सेवा संघाचे कर्मठ कार्यकर्ते कैलाश भेलावे व गणेश भेलावे यानी आपल्या दिवंगत आई लक्ष्मीबाई भेलावे यांच्या तिसऱ्या स्मृतिदिना निमित्त नगर परिषद गोंदियाच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत “सावली” नागरी बेघर बेघरांसाठी निवारा(रैन बसेरा) धोटे सूतिका गृह गोंदिया येथील लाभार्थींना चादर भेंट (२० बेड सिट) मदत म्हणून प्रदान केले. या कार्यक्रमा प्रसंगी सर्व मान्यवर मंडळी धनराज बनकरजी (व्यस्थापक सामाजिक विकास आणि पायाभूत सुविधा न.प.गोंदिया) , सुनंदाताई बिसेन ( व्यवस्थापक कौशल्य विकास आणि उद्योजकता न.प.गोंदिया), माधुरीताई भेलावे, विनाताई भेलावे, राजु कापसेजी, मनोजभाऊ मेंढे, अतुलजी सतदेवे, सुनीलभाऊ भोंगाड़े, शुभम अहाके, भक्तराज भेलावेजी, हिरू बाबा विश्वकर्मा, चेताननजी लांजेवार, राकेशजी लांजेवार, कु.छायांकी , कु.साक्षी, कु .प्रियंका, हिमेश, प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरिता निवारा व्यवस्थापक हेमंत मेश्राम आणि काळजी वाहक पूर्णप्रकाश कुठेकर, रवींद्र बोरकर, लील्हारेजी यांनी अथक परिश्रम घेतले.

Exit mobile version