Home विदर्भ प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी २९ जुलैपर्यंत मुदतवाढ- जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी २९ जुलैपर्यंत मुदतवाढ- जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

0

वाशिम, दि. २४ : खरीप हंगामासाठी लागू करण्यात आलेल्या पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी २९ जुलै २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नजीकच्या सामुहिक सुविधा केंद्र अथवा बँकेत विमा प्रस्ताव सादर करून या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले आहे.प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत जिल्ह्यातील नऊ पिकांना विमा संरक्षण मिळणार असून नैसर्गिक आपत्ती, किड व रोगामुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येणार आहे. कर्जदार शेतकाऱ्यांना पीक विमा बंधनकारक आहे. तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.

सोयाबीन, कापूस, तूर, मुग, उडीद व खरीप ज्वारी पिकाचा प्रधानमंत्री पीक विमा विमा योजनेत समावेश आहे. तसेच भात पिकासाठी वाशिम, रिसोड व मालेगाव तालुक्याचा समावेश असून भुईमुग पिकासाठी मालेगाव, कारंजा व तीळ पिकासाठी वाशिम, मानोरा, कारंजा तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे.  तसेच अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिके घेणारे कुळाने अगर भाडेपट्ट्याने जमीन करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी पात्र आहेत.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी विहित प्रपत्रात नजीकच्या सामुहिक सुविधा केंद्र (कॉमन सर्व्हिस सेंटर) अथवा बँकेकडे विमा प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालय, कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी केले आहे.

 पीक विमा योजनेचा पीकनिहाय विमा हप्ता

पिकाचे नाव विमा संरक्षित

रक्कम रु.(प्रति हेक्टर)

शेतकऱ्यांनी भरावयाचा

पीक विमा हप्ता

सोयाबीन ४३,०००/- ८६०/-
कापूस ४३,०००/- २१५०/-
तूर ३१,५००/- ६३०/-
मुग व उडीद १९,०००/- ३८०/-
खरीप ज्वारी २४,५००/- ४९०/-
तीळ २३,१००/- ४६२/-
भुईमुग ३२,०००/- ६४०/-
भात ४३,५००/- ८७०/-

Exit mobile version