Home विदर्भ ओबीसी युवा महासंघाचा जिल्हाध्यक्ष रुचीत वांढरेसह एकाला ठेवले नजरकैदेत

ओबीसी युवा महासंघाचा जिल्हाध्यक्ष रुचीत वांढरेसह एकाला ठेवले नजरकैदेत

0

गडचिरोली,दि.४: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज गडचिरोली पोलिसांनी राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाच्या जिल्हाध्यक्ष रुचित वांढरे यांच्यासह राहुल भांडेकर व अन्य एका कार्यकर्त्यास त्यांच्या घरुन ताब्यात घेऊन नजरकैदेत ठेवल्याने खळबळ माजली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज रात्री ७ वाजता गडचिरोली येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत कुणीही गोंधळ घालू नये यासाठी पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून धरपकड मोहीम राबवली. आज सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रुचित वांढरे यांच्या घरी पोलिस पोहचले. त्यांनी वांढरे यांना वाहनात बसवून पोलिस ठाण्यात आणले. तेव्हापासून ते पोलिसांच्या नजरकैदेत आहेत. यावेळी ‘७ ऑगस्टला’ हैद्राबाद येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अधिवेशन असून, मी त्या अधिवेशनाला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेत कुठलीही घोषणाबाजी करण्याचे आपले प्रयोजन नाही’, असे आपण पोलिसांना सांगितले. त्यावेळी पोलिसांनी तिकिट मागितले असता मी राहुल भांडेकर यास तिकिट घेऊन बोलावले. परंतु पोलिसांनी त्यालाही पोलिस ठाण्यात बसवून नजरकैदेत ठेवले, असे रुचित वांढरे यांनी सांगितले.

Exit mobile version