गोंदिया,दि.10 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय व जिल्हा वकील संघ गोंदिया यांचे संयुक्त वतीने 7 जानेवारी रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुहास माने यांचे अध्यक्षतेखाली मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमीत्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एम.बी.दुधे, न्यायीक अधिकारी सर्वश्री एन.आर.वानखडे, एस.जे.भट्टाचार्य, जे.एम.चव्हाण, आर.डी.पुनसे, व्ही.आर.आसुदानी, वासंती मालोदे, पी.सी.बच्छेले, एन.एम.डी.कॉलेजचे प्रा.सिध्दार्थ रामटेके, तज्ञ मार्गदर्शकांची प्रमुख उपस्थिती होती.प्रा.रामटेके म्हणाले, मराठी ही आपली मातृभाषा आहे. मराठी भाषेचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. न्यायालयीन कामकाजामध्ये सुध्दा मराठी भाषेचा उपयोग मोठ्या प्रमाणावर व्हायला पाहिजे. मराठी भाषेचे संवर्धन करणे ही आपली प्राथमिकता आहे असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाला वकील वर्ग, पॅनेल वकील, कर्मचारी व पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे के.व्ही.ढोमणे, जी.सी.ठवकर, एस.एम.कठाणे, एल.पी.पारधी, पी.एन.गजभिये, डी.डी.मेश्राम, एस.एस.पारधी यांनी सहकार्य केले.