
अर्जुनी-मोर(संतोष रोकडे)दि.10ःःगोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात रब्बी हंगामासाठी बाग इटिया डोह धरणाचे पाण्याने सिंचन होते अजुर्नी मोरगाव तालुक्यातून रब्बी हंगामात धान पीक घेतले जाते यावर्षी धरणात जवळपास ९६ टक्के पाणी असल्याने अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेतकर्यांना शेती सिंचनाकरिता पाणी उपलब्ध होऊन धान पीक रब्बी हंगामात घेउ या आशेने क्षेत्र धारक शेतकर्यांनी आपल्या शेतात दुसरे कोणतेही कडधान्य वर्गीय पिके टाकलेले नाही दरवर्षी साधारण डिसेंबर महिन्याच्या शेवटी ला पाणी सोडले जात होते मात्र या वर्षी या धरणाचे पाणी सोडण्यासाठी विलंब होत असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडलेला आहे जानेवारी महिन्याची दहा तारीख देऊनही आतापयर्ंत धरणाचे पाणी न सुटल्याने जून महिन्यात पावसाळा सुरू होतो व रब्बी हंगामात घेतलेले पीक पावसात सापडतात पयार्याने शेतकर्यांची नुकसान होते त्यामुळे शक्य तेवढ्या लवकर इटियाडोह धरणाचे व्यवस्थापनाने लवकरात लवकर पाणी सोडून सिंचनाची सोय उपलब्ध करून द्यावी अशी मागणी जनतेकडून होत आहे
प्रकल्पस्तरीय समितीच्या अध्यक्ष व सदस्य यांनी राजीनामा दिला आहे. इटियाडोह धरणच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी गावागावात पाणीवापर सोसायट्या स्थापन करण्यात आलेल्या प्राप्त माहितीनुसार प्रकल्पस्तरीय समितीचे अध्यक्ष नामदेवराव सोरते व काही सदस्यांनी राजीनामा दिल्याने पेचप्रसंग निर्माण झाला तसेच अधिकारी वर्गार्चे दुर्लक्ष त्यामुळे धरणाचे पाणी सुटण्यासाठी विलंब होत आहे त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडलेला आहे शेतकरी हिताचा विचार करता लवकरात लवकर सिंचनाची सोय करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे