
धानोरा,दि.10ःःउपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय धानोराच्यावतीने स्थानिक पोलिस ठाण्याच्या पटांगणात मंगळवारी महिला हस्तकला स्पध्रेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पध्रेत गॅरापत्तीची शामकुबाई तुलावी हिने सादर केलेल्या बाबुसंच हस्तकलेला प्रथम क्रमांक प्राप्त केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड, पोलिस निरीक्षक विवेक अहिरे, सहायक पोलिस निरीक्षक अंजली राजपूत उपस्थित होते.
या महिला हस्तकला स्पध्रेत तालुक्यातील अतिदुर्गम भागातील महिलांनी मोठय़ा संख्येने सहभागी घेतला व नाविण्यपूर्ण बांबू हस्तकला, कास्ट हस्तकला, विविध प्रकारचे झुले, धानाच्या ओंबीचे दृष्य हस्तकला बांबुपासून बनविले. तसेच मंदीर, सुप, टोपल्या, जहाज, वॉलपीस व आकर्ष हस्तकलांनी स्पर्धा गाजली. या स्पध्रेचे निरीक्षक व परीक्षक म्हणून सामाजिक कार्यकर्ते मुन्ना चंदेल, रंगकर्मी सोपानदेव मशाखेत्री, सेवानवृत्त मुख्याध्यापक देवानंद मशाखेत्री, प्राचार्या जयश्री लोखंडे, शिक्षिका वैष्णवी राऊत, चेतना गुरनुले, पटेल यांनी काम पाहिले.
या हस्तकला स्पध्रेत शामकुबाई तुलावी रा. गॅरापत्ती प्रथम, र%कला पुरणशा कोल्हे रा. कटेरी द्वितीय, निशा घनश्याम मडावी धानोरा यांच्या शोपीस हस्तकलेने तृतीय क्रमांक प्राप्त केला. मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. संचालन अंजली राजपूत यांनी केले.