2 ते 20  मार्च या कालावधीत सामुदायिक औषधोपचार मोहिम

0
89

भंडारा,दि.25:- राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत 2 ते 20 मार्च 2020 या कालावधीत जिल्हयात सामुदायिक औषधोपचार मोहिम राबविण्यात येणार आहे. सदर मोहिमेचे अंतर्गत जिल्हयातील सर्व जनतेला डी.ई.सी गोळया, आयव्हरमेटीन गोळया व ॲलबॅण्डोझोल गोळया खावू घालण्याचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत शुन्य ते 2 वर्ष वयोगटातील बालके, गरोदर माता व गंभीर आजारी रुग्ण यांना वगळण्यात आले आहे.  ग्रामीण भांगात 2 ते 13  मार्च व शहरी भागात 2 ते 20 मार्च या कालावधीमध्ये ही मोहिम राबविण्यात येणार आहे.

जिल्हयातील एकूण 12 लाख 60 हजार 88 लोकसंख्येमध्ये ही मोहिम राबविण्यात येत असून याकरीता गोळया वाटप कर्मचारी 5061, पर्यवेक्षक कर्मचारी 1012 लागणारआहे. या मोहिमेत सर्व शासकीय, निमशासकीय शाळा, कॉलेज, कार्यालय व इतर सार्वजनिक ठिकाणी गोळया खाऊ घालण्यात येणार आहे. गोळयाचे सेवन उपाशापोटी करु नये.

आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचारी मार्फत गोळयाचे प्रत्यक्ष सेवन करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा हिवताप अधिकारी यांनी केले आहे.