चिचगड(सुभाष सोनवणे)दि.03ः- गोंदिया जिल्ह्यातील चिचगड परिसरात आज 3 मार्च रोजी सायकांळी आलेल्या चक्रीवादळामुळे चिचगड वनपरिक्षेत्र कार्यालय व अधिकारी यांच्या निवासस्थानाचे छत उडाले असून मोठे नुकसान झाले आहे. तसेच वनपरिक्षेत्र कार्यालय चिचगडवर निंबाचे मोठे झाड तसेच वायरलेस टॉवर कोलमडले.तर वनवसाहतीमधील शासकीय निवास स्थानाचे मोठ्या प्रमाणात पडझड झाली. यात जीवितहानी होण्यापासून कार्यालयीन कर्मचारी थोडक्यात बचावले.