Home विदर्भ ७ व ८ मार्च रोजी भजीयापार येथे लोककला महोत्सव

७ व ८ मार्च रोजी भजीयापार येथे लोककला महोत्सव

0

आमगाव,दि.04: महाराष्ट्र राज्य शाहीर परिषद पुणेच्या गोंदिया जिल्हा शाखेच्यावतीने दोन दिवसीय सर्वस्तरीय भव्य कलाकार मेळावा तसेच लोककला महोत्सवाचे आयोजन ७ व ८ मार्च रोजी तालुक्यातील भजीयापार येथे आयोजित करण्यात आले आहे. या महोत्सवात शाहीरी, भजन, दंडार, किर्तन, खडीगंमत, तमाशा, पोवाडा, कव्वाली, लावणी, भारूड, नाटक आदि सांस्कृतीक कार्यक्रम तसेच विदर्भातील पारंपारिक लोककला, नृत्य सादर करण्यात येणार आहेत. ७ मार्च रोजी या लोककला महोत्सवाचे उद्घाटन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते आमदार सहषराम कोरोटे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. दिप प्रज्वलन आमदार मनोहर चंद्रीकापुरे करणार आहेत. सायंकाळी ७ वाजता राष्ट्रीय संगीत तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार हेमंत पटले यांच्या हस्ते आमदार विजय रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. दिप प्रज्वलक म्हणून युवा स्वाभिमान संगठनेचे जिलाध्यक्ष जितेश राणे उपस्थित राहणार आहेत. ८ मार्च रोज रविवारला आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार केशवराव मानकर राहणार असून विशेष पाहुणे म्हणून खासदार अशोक नेते, माजी आमदार भेरqसह नागपुरे, संजय पुराम, अ‍ॅड. येसूलाल उपराडे, अशोक पटले, राजू पटले, राकेश शेंडे, संतोष चव्हाण, चितू पटले, बी.बी.बिसेन आदि उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवाचा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावे तसेच कलाकारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र शाहीर परिषद गोंदियाचे अध्यक्ष मधूकर बांते, उपाध्यक्ष सिताराम मेश्राम, बलीराम कोहळे, ओमप्रकाश बांते, देवाजी शेंडे, प्रकाश मेश्राम, दिनदयाल मानकर, माणीकराम टेंभरे, तुकाराम बानक, शिवदास साखरे, छबीलाल बडोले, पुंडलिक बारसे, टिकाराम खोटेले, मंगल कटरे आqदनी केले आहे.

Exit mobile version