Home विदर्भ नागपूर मेट्रोला तारीख पे तारीख !

नागपूर मेट्रोला तारीख पे तारीख !

0

नागपूर दि.२८-: मेट्रो रेल्वेच्या पहिल्या टप्प्यातील ८० कोटी रुपयांच्या बांधकामाची पहिली निविदा उघडण्याची तारीख तांत्रिक अडचणीमुळे पुन्हा लांबणीवर गेली आहे. ही निविदा आता जूनच्या पहिल्या आठवड्यात उघडणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. कंपनीने पहिली ऑनलाईन निविदा १८ एप्रिलला जारी केली होती.
जवळपास ८० कोटी रुपयांच्या निविदेत सहा जणांनी रुची दाखविली होती. त्यांची कागदपत्रेही प्राप्त झाली. त्या आधारावर तांत्रिक मूल्यांकन करुन ही निविदा १८ मे रोजी उघडणार होती. त्यानंतर ही निविदा २५ मेपर्यंत उघडण्याचे अधिका-यांनी जाहीर केले होते. निविदा उघडण्यापूर्वी सदर झालेल्या निविदातील तांत्रिक बाबींचे अवलोकन केल्यानंतरच काम देण्यात येईल, असे अधिका-यांनी सांगितले आहे.

Exit mobile version