गोंदिया,दि.05ः : नगर परिषद गोंदिया अंर्तगत केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत सावली शहरी बेघर निवारा गोंदिया अंतर्गत शहर पोलीस ठाणे गोंदिया येथे पोलिस कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रम उपसंचालक नगर परिषद प्रशासन संचालनालय मुंबई यांच्या आदेशानुसार घेण्यात आले. शहरात रेल्वे स्टेशन, बस स्थानक, उड्डाणपुलाच्या खाली, मंदिर परिसरात जे उघड्यावर असतात, अशा सा बेसहारा लोकांना ऊन, वारा पाऊस यांच्यापासून बचाव करण्यासाठी सदर बेघर लोकांना ठेवण्यात येत असते. सदर निवारा मागील एक वर्षापासून नगर परिषद मार्फत चालू करण्यात आलेला आहे. आजघडीला सदर निवारामध्ये बेघर १९ लाभार्थी आहेत. त्यांना मोफत जेवण व राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच तेथील लाभार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येत असतात. तसेंच लाभार्थी यांचा मार्फत कागदी पिशवी /पाकीट तयार केले जात असून मेडिकल स्टोअर विकले जात असतात.
नगरपरिषद गोंदियाअंतर्गत १०० बेड निवाराची व्यवस्था इंजिन शेड शाळेत करण्यात येणार आहे. अशी माहिती व्यवस्थापक धनराज बनकर यांनी दिली. सदर कार्यशाळेला पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, सहायक पोलीस निरीक्षक संतोष सपाटे, नितीन सावंत, श्रीकांत मोरे, पोलिस उपनिरीक्षक प्राजक्ता पवार, हेमंत मेश्राम, कुथेकर, लिल्हारे, बोरकर, शिपाई सुरेंद्र डहाट यांच्यासह पोलिस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.