
भंडारा,दि.06ः-ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्याचा प्रस्ताव छत्तीसगढ विधानसभेत पारित करण्यात यावा, या आशयाचे निवेदन ओबीसी क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्यांनी मुख्यमंत्री भुपेंद्र बघेल यांना निवेदन दिले.
यावेळी ओबीसी क्रांती मोर्चातर्फे गृहमंत्री ताम्रध्वज शाहू, विधानसभाध्यक्ष चरणदास महंत व आरोग्य मंत्री टी. एस. सिंहदेव, महिला काँग्रेस नेता तथा भिलाईच्या माजी महापौर निता लोधी यांच्यामार्फत रायपूर येथे भेट देत ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी, या मुद्यांवर चर्चा केली. यावेळी छत्तीसगढ विधानसभेत प्रस्ताव पारित करण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच महाराष्ट्र व बिहार विधानसभेत ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्याचा प्रस्ताव पारित करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्यात आले आहे.
निवेदन देणार्या शिष्टमंडळात मुख्य संयोजक संजय मते, सुकराम देशकर, राहुल दमाहे, राहुल इलमे, युवराज वर्मा, विनोद उके, नरेश सागरवंशी तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते