ऑटो-टिप्परच्या अपघातात दोन जण ठार

0
234

गडचिरोली,दि.6:मालवाहू ऑटो व टिप्पर यांच्यात जोरदार धडक झाल्याने दोन जण जागीच ठार झाले. आलापल्लीपासून ७ किलोमीटर अंतरावरील तानबोडी फाट्याजवळ हा अपघात झाला.ऑटो चंद्रपूरवरुन कोल्ड्रींक घेऊन येत होता, तर टिप्पर आलापल्लीकडून आष्टीच्या दिशेने जात होता. दोन्ही वाहनांची समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात ऑटो व दोन्ही मृतदेह छिन्नविछिन्न झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक प्रवीण डांगे यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक श्री.शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला.