चामोर्शी तालूक्यात निराधार योजनेची,समाधान शिबीरात 122 प्रकरणे मंजूर 

0
52

गडचिरोली, दि.6:- राज्यात निराधार वृध्द व्यक्ती, अंध, अपंग, शारिरीक व मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्ती, निराधार विधवा, परीतक्ता, देवदासी महीला, अनाथ बालके इत्यादींचे जीवनमान सुसहय करण्यासाठी त्यांना विविध योजनांच्या माध्यमातून मासिक अर्थसहाय्य देण्यात येते. योजनांचा लाभ अधिकाधिक नागरीकांपर्यंत पोहचविण्याकरीता चामोर्शी तालुक्यातील महाराजस्व अभियान तथा समाधान शिबीर अंतर्गत जनजागृती करुन लाभार्थ्यांचे विहीत नमुन्यात अर्ज घेण्यातआले.

वरील योजनेच्या लाभार्थ्यांकडून प्राप्त झालेले अर्ज दिनांक 27 फेब्रुवारी 2020 संजय गांधी निराधार योजना समितिचे अध्यक्ष संजय गंगथडे ,तहसिलदार चामोर्शी,  नायब तहसिलदार दिलीप दुधबळे, तसेच  कु. डी. सी. सहारे क.लि., चामोर्शी यांचे उपस्थितीत सभा आयोजित करुन पुढील प्रमाणे अर्ज  मंजूर- नामंजूर करण्यात आले.

संजय गांधी योजना समितीसमोर ठेवण्यात आलेल्या प्रकरणाची माहिती  श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्तीवेतन योजना , संजय गांधी निराधार अनुदान योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना प्राप्तअर्ज 131, मंजूर प्रकरणे 122, नामंजूर प्रकरणे 09, नमुद केल्याप्रमाणे सर्व अर्ज मंजुरीच्या कार्यवाहीकरीता तहसिलदार चामोर्शी, अध्यक्ष संजय गांधी योजना समिती, चामोर्शी यांचे समोर ठेवण्यात आले. अर्जाची तपासणी व छाणणी करण्यात आली. प्राप्त असलेली प्रकरणे आणि प्रलंबित असलेल्या प्रकरणांपैकी अध्यक्ष यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता झालेली प्रकरणे मंजूर करण्याबाबत शिफारस करण्यात आली. पात्र असलेले अर्ज योजना निहाय वरील प्रमाणे मंजुर करण्यात आले. असे  तहसिलदार संजय गंगथडे, चामोर्शी  कळवितात.