आशासेविकांचा मोर्चा जि.प.वर धडकला

0
210

गोंदिया,दि.14ः आशासेविकांच्या रास्त मागण्यांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत आहेत, आशासेविकांना न्याय देण्यात यावा, या मागणीला घेऊन आयटकच्या नेतृत्वात  (दि.१३) जि.प. कार्यालयावर आशासेविकांचा मोर्चा धडकला. दरम्यान शासन-प्रशासनाविरुद्ध निदर्शने करण्यात आली. तसेच विविध मागण्यांचे निवेदन जि.प. मार्फत राज्य सरकाराला देण्यात आले.
आशासेविकांना वेतन देण्यात यावे, कायम सेवेत रुजू करण्यात यावे या मागणीला घेऊन जि.प. कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोच्यार्चे नेतृत्वात हौसलाल रहांगडाले, रामचंद्र पाटील, शालुताई कुथे, चरणदास भावे, करुणा गणविर यांनी केले. मोच्र्यात सहभागी आशासेविकांनी राज्य सरकाराविरुद्ध निदर्शने केली. तसेच मोर्चेकराच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन जि.प.चे मुकाअ. यांच्या मार्फत राज्य सरकाराला सादर केले. या मोच्र्यात जिल्ह्यातील आशासेविका मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. उल्लेखनीय असे की, एनएचएमचे कर्मचार्?यांचे कालपासून कामबंद आंदोलन सुरू आहे, त्याच प्रमाणे रुग्णवाहिका चालकही संपावर आहेत. त्यातच आशासेविकांचा आंदोलनामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा ठप्प पडली आहे.