गोंदिया,दि.१४– शुक्रवारी रात्री झालेल्या वादळी गारपिटीने गोंदिया जिल्ह्यातील शेतपिकाची धूळधाण केली आहे. या वादळाची तीव्रता अधिक असल्याने शेतातील उभे पीक भुईसपाट झाले तर गारांमुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाने गहू व चणा हा माल जागीच फुटून जमीनदोस्त झाला आहे. गारांचा आकार मोठ्या लिंबाएवढा असल्याने लोकांच्या घरांवरील पत्रे, मोटारींच्या काचा व पक्ष्यांना त्याचा मोठा फटका बसला. जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथे अतिवृष्टी झाली. येथे८९ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. या परिसरातील टरबूज, भेंडी, चवळी, मका, कारली या भाज्या जमीनदोस्त झाल्या आहेत. विजेचे खांब कोसळून विद्युत पुरवठाही खंडित झाला आहे. या सर्व नुकसानाची भरपाई शासन देईल काय याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.गोरेगाव तालुक्यातील कटंगी धरणाजवळ शेकडो पोपटांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.शनिवारी (दि.१४) सकाळी निसर्ग मिंत्र मंडळाचे रेखलाल टेंभरे,गुड्डु कटरे, रेवेन्द्र बिसेन,दिलीप चव्हाण,अमित रहांगडाले, बाबा चौधरी व वन विभाग कर्मचार्यांनी धरणाजवळ पोहचून पाहणी केली. तसेच जखमी असलेल्या पोपटांना प्राथमिक उपचारासाठी हलविण्यात आले.कंटगी धरणाजवळ वनविभागाच्या सागवान नर्सरी परिसरात गुरूवार आणि शुक्रवारी रात्रीच्या सुमारास वादळी पाऊस आणि गारपीट झाली.याचा तडाखा नर्सरी परिसरात वास्तव्यास असलेल्या पोपटांना बसला.गारपिटीमुळे शेकडो पोपटांचा मृत्यु झाल्याने नर्सरी परिसरात मृत पोपटांचा अक्षरक्ष: सडा पडला होता.सदर धरण परिसरात 50 एकर मध्ये वनविभागाचे सागाचे जंगल असून लाखोच्या संख्येत पोपटांचा इते वास्तव्य आहे.
नवेगावबांध परिसराला अवकाळी पावसाने झोडपले
नवेगावबांध व परीसरात गुरुवारच्या सांयकाळी वादळी वा-यासह गारपीटीसह पावसाने झोडपलेच, परंतु १४ मार्चच्या
मध्यरात्रीपासून आलेल्या अवकाळी वादळी वाèयासह झालेल्या पावसाने शेतकèयांचे उरलेसुरलेही पिक घेऊन गेले. त्यामुळे होते नव्हते ते सर्व रब्बी पिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे.तलाठ्यांनी अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून, शेतकèयांना ताबडतोब आर्थिक मदत शासनाने द्यावी यासाठी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या मदतीने आपण लवकरच मुख्यमंत्र्याची भेट घेणार असल्याचे नवेगावबांध जिल्हापरिषद क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यांनी सांगितले .