जिल्हयात आठ परदेशी व्यक्ती;करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत बैठक 

0
328
????????????????????????????????????

भंडारा,दि. 16 :- जिल्हयात आठ परदेशातील  व्यक्ती आल्या असून त्यांची करोना विषयक तपासणी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांनी दिलीतसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत आय.ए.सी टीम ग्रामस्तरावर नियुक्त करण्यात आल्या असून त्यामध्ये एक शिक्षक व आंगणवाडी सेविका राहणार आहेत. या प्रत्येक घरी जावून करोना बाबत समुपदेशन करुन त्यांना प्रतिबंधात्मक उपायाबाबत माहिती देणार आहे, असे ते म्हणाले. करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना  करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद मोटघरे, तसेच सर्व उपविभागीय अधिकारी,उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोदवड, तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांनी तहसिलदारास करोना जनजागृती बाबत आदेशित करावे. तसेच गामस्तरावर तलाठी व ग्रामसेवकांनी स्वच्छतेबाबत नागरिकांना जागृत करावे, असे जिल्हाधिकारी यांनी आदेशित केले. पोलीस विभागाने बाहेर गावातून आलेल्या व्यक्तींची माहिती आर.आर.टी ला दयावी.  नागरिकांनी फेक न्युज व फेक सॉनिटायझर आढळल्यास तात्काळ पोलीसांकडे तक्रार करावी,असे जिल्हाधिकारी म्हणाले. आरोग्य विभागाने  रुग्णांची तपासणी करुन औषधांचा साठा तयार ठेवावा. तसे प्रमाणपत्र जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दयावे व औषधांचा साठा अपूरा पडणार नाही याची दक्षता घ्यावी,  आरोग्य विभागाने रुग्णांच्या व्यवस्थेबाबत  सक्रीय रहावे, असे ते म्हणाले. प्रत्येकांनी हातस्वच्छ धुवावे व सॅनिटायझरचा उपयोग करावा.पोलीसांनी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे यांनी सूचना दिल्या. तसेच करोनाबाबत ऑडिओ व व्हिडिओ द्वारे जनजागृती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील शाळा 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी  मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल्या.

समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना परिक्षार्थी सोडून सुट्टया जाहिर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. या बैठकीत विविध विभागांना करोना उपाय योजनाबाबत घ्यावयाच्या काळजी बाबत आदेशित करण्यात आले.

.