चंद्रपूर,दि.17: महाराष्ट्र शासन हे गाव तिथे वाचनालय हे धोरण राबवित आहे. वाचन संस्कृती समृद्ध करण्याचे उद्देशाने शासनाने विविध योजना निर्माण केलेल्या आहेत. याच अभियाना अंतर्गत अरिहंत बुक डीस्ट्रीब्युटर्स चिमूर यांच्या वतीने भव्य पुस्तक खरेदी सवलत योजना बनविली आहे. या योजने अंतर्गत मूळ किंमत पंच्याहत्तर हजार रुपये पुस्तके फक्त अठरा हजार रुपयात देण्यात येणार आहे. ही योजना महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात मर्यादित कालावधीकरिता राहणार आहे. प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य हे तत्व स्वीकारले असल्याची माहिती अरिहंत बुक डीस्ट्रीब्युटर्सचे संचालक सुरेश डांगे यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील वाचन संस्कृती समृद्ध व्हावी या उद्देशाने शंभर पुस्तकांचे पंधरा हजार रुपये छापील किंमतीचे वेगवेगळे संच उपलब्ध करून दिले आहे. यात एकूण पाचशे पुस्तकांची मूळ किंमत पंच्याहत्तर हजार रुपये असून ती शाळा, महाविद्यालय, सार्वजनिक वाचनालय व अन्य अभ्यासु व्यक्तीकरिता केवळ अठरा हजार रुपयामध्ये देण्याचा संकल्प केला असल्याचे सांगून अरिहंत बुक डीस्ट्रीब्युटर्सचे संचालक सुरेश डांगे पुढे म्हणतात की, एकूण शंभर पुस्तकांचा केवळ एक संचाची मूळ किंमत पंधरा हजार रुपये आहे. एक संच खरेदी केल्यास याच पाच हजार रुपये, कोणतेही दोन संच खरेदी केल्यास नऊ हजार रुपये, तीन संच खरेदी केल्यास बारा हजार रुपये, कोणतेही चार संच खरेदी केल्यास फक्त पंधरा हजार रुपये व सर्व पाचही संच खरेदी केल्यास फक्त अठरा हजार रुपयात देण्यात येतील.
महाराष्ट्र शासन ग्रंथ निवड व शिफारस समितीने मान्यता देण्यात आलेली पुस्तके राहतील. एकुण पाच संचातील तीन संचात चाळीस टक्के शासनमान्य व उर्वरित दोन संच हे पूर्णतः शासनमान्य राहतील. शासनमान्य पुस्तकावर शासन मान्यतेच्या मंजुरी क्रमाक असेल. सर्वच दर्जेदार, कथा, कादंबरी, ललीत, बाल वाड:मय व संदर्भ या विषयाचा समावेश समावेश आहे अशी माहिती देण्यात आली. पुस्तक खरेदी भव्य सवलत योजने अंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हातील फक्त पंच्याहत्तर शाळा, महाविद्यालय व सार्वजनिक वाचनालय सहभागी होऊ शकतात. प्रथम येणा-यास प्रथम प्रथम प्राधान्य हे तत्व असल्यामुळे ही योजना सुरु केली आहे. या योजनेला प्रचंड असल्याचे सांगण्यात आले.
या योजने संदर्भात सविस्तर व पुस्तकांच्या यादीबाबत सुरेश डांगे चिमूर जि. चंद्रपूर मो. न. ८६०५५९२८३० यांचेशी प्रत्यक्ष भेट घेऊन अथवा भ्रमणध्वनीवर संपर्क साधता येतो. पुस्तक पाठविण्याचा खर्च हा शाळा, महाविद्यालय व सार्वजनिक वाचनालय यांना करावा लागणार नाही. महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्हात पुस्तकाचे पार्सल स्वखर्चाने पाठविण्याची सुविधा उपलब्ध आहे अशी माहिती सुरेश डांगे यांनी दिली.