
ब्रह्मपुरी,दि.17ःस्वातंत्र्यपूर्व १९३१ ला ओबीसींची जनगणना झाली होती. त्यानंतर अजूनपयर्ंत ओबीसींची जातीनिहाय जनगणना झालेली नाही. त्यामुळे ओबीसींची जनगणना झाली पाहिजे, या मागणीसाठी ब्रह्मपुरी तालुक्यात ओबीसी जनगणना अस्मिता रथयात्रा आयोजित करण्यात आली होती.
भारतीय घटनेच्या कलम ३४0 नुसार ओबीसींची जनगणना करून लोकसंख्येतील संख्या निश्चित करून ओबीसी समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सर्व क्षेत्रातील व संशोधनातील वाटा प्रधान करायला पाहिजे. त्यासाठी ओबीसींची जनगणना करून ओबीसींची स्वतंत्र सूची निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी राष्ट्रीय जनगणना २0२१ मध्ये ओबीसींचा स्वतंत्र रकाना असणे आवश्यक आहे. परंतु २0२१ जनगणनेच्या प्रपत्रता मध्ये तसा रकाना नाही म्हणून ओबीसी समाज ओबीसींचा स्वतंत्र रकाना नसेल तर माझा जनगणनेत सहभाग नाही, जनगणनेवर बहिष्कार, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतने भागीदारी, ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा, अशा घोषणा देत ओबीसींची जनगणना रॅली घड्याळ, वायगाव, तुलाण, मेंडकी, नीलज, किन्ही, बेटाळा, सोनेगाव, बोरगाव, चिंचोली असे मार्गक्रमण करीत दुपारी पाच वाजता ब्रम्हपुरी येथे हुतात्मा स्मारकाजवळ पोहोचली. तेथून ब्रह्मपुरी शहरातील प्रमुख मार्गावरून जनजागरण करीत गंगाबाई तलमले महाविद्यालयात समारोपीय सभा आयोजित करण्यात आली.
याप्रसंगी ओबीसी नेते श्याम लेढे, सचिन राजूरकर, रामराव हरडे, ब्रम्हपुरी पं. स. सभापती रामलाल दोनाडकर यांनी ओबीसी समाजाला ओबीसी जनगणनेचे महत्त्व समजावून सांगितले व २0२१ च्या जनगणनेवर ओबीसी बांधवांनी बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले. याप्रसंगी प्रा. प्रकाश बगमारे, प्रा.राकेश तलमले, भाउूराव राऊत, मोंटू पिलारे, रवी रणदिवे व ओबीसी कर्मचारी महासंघाचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येत उपस्थित होते.