रस्ता बांधकामातील गैरव्यवहार दाखविणाèयाला कंत्राटदारासह अभियंत्याची धमकी

आमगाव पोलिसात गजानन बिसेन यांनी नोंदविली तक्रार

0
921

आमगाव,दि.१७ः- मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत गेल्या अनेकवर्षापासून भोगंळ कारभार सुरु असून रस्तेबांधकामाकडे पाहिजे तसे लक्ष दिले जात नसल्याचे समोर येऊ लागले आहे.त्यातच रस्ता बांधकामात गुणवत्ता राखा आणि योग्य काम करा असे म्हणणाèया सामान्य नागरिकांनाच जिवे मारण्याची धमकी कंत्राटारासोबतच अधिकारी देऊ लागल्याने खरंच यांच्या कामाची गुणवत्ता असेल काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.तालुक्यातील ठाणा-कोसमटोला या रस्ताचे ७४ लाख रुपये खर्चून बांधकाम हाती घेण्यात आले.दरम्यान वनविभागाच्या जागेत खोदकाम झाल्याने वनविभागाचे वनपाल जी.आय.लांजेवार यांनी जेसीबीने सुरु असलेले खोदकाम बंद पाडून शासकीय पंचनामा केला.तसेच त्या पंचनाम्यावर रस्त्याशेजारील शेती असलेले गजानन बिसेन यांच्यासह इतरांच्या स्वाक्षरी घेतल्या.त्यावेळी नायबतहसिलदार सुध्दा हजर होते.ही प्रकिया सुरु असतानाच आदित्य परमार व अभियंता कापगते यांनी बिसेन यांना शिविगाळ करुन मारण्याची धमकी देत आमच्याविरोधात स्वाक्षरी करतो काय असे म्हणत बघून घेण्याची धमकी दिली.
वास्तविक या रस्ताच्या दुरुस्तीच्या सुरवातीच्या कामापासूनच नागरिकांनी अंदाजपत्रकात व फलकावर दाखविल्यानुसार योग्य साहित्य वापरण्याची मागणी केली.ती मागणी करणारे ठाणा निवासी गजानन बिसेन यांनाच कंत्राटदार आदित्य परमार व या कामाचे पाहणी करणारे उपअभियंता दिनेश कापगते यांनी १६ मार्च रोजी रस्ता बांधकामाच्या पाहणीवेळी कामात अडथळा निर्माण केल्यास गोंदियात पाय ठेवू देणार नाही अशाप्रकारची धमकीच दिल्याने सदर प्रकरण आमगाव पोलिसात दाखल झाले आहे.अधिकाèयांनीही कंत्राटदाराची बाजू घेण्यापेक्षा कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष देणे महत्वाचे असतांना नागरिकांच्या तक्रारीला केराची टोपली दाखविण्याचा प्रकार याठिकाणी घडला.सदर रस्त्याचे काम ५ प्रकियेत करायचे होते.त्यामध्ये पहिला रस्ता खोदणे व त्यावर मातीकाम करणे,त्यानंतर पाणीघालून रोलरने दाबणे,खडीकरण करुन मुरुमाचा थर देणे असाप्रकारे रस्त्याचे बांधकाम करायचे होते.पुन्हा खडीकरण त्यानंतर डाबंरीकरण करुन काम करायचे होते.रस्त्याची बाजू भरण्यासाठी वनविभागाच्या क्षेत्रात जेसीबीने खोदकाम करुन मातीघालण्यात आल्याने मुळासह झाडे उन्मुलन पडल्याने ती झाडे मरणासन्न अवस्थेत पोचल्याने गजानन बिसेन यांनी आमगाव येथील तहसिलदारासह वनविभागाचे अधिकारी व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या संबधितांना माहिती दिली.त्याआधारे १६ मार्चरोजी सदर रस्त्याची पाहणी करीत असतांना कंत्राटदार उदय परमार यांनी बिसेन यांना शिविगाळ करीत मारण्याची धमकी सर्वासमक्ष दिल्याने कंत्राटदाराची मुजोरी समोर आली आहे.बिसेन यांनीही घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आमगाव पोलिसात तक्रार दाखल केली असून याप्रकरणात सखोल चौकशी करुन उपअभियंत्याचीही तपासणी करण्याची मागणी केली आहे.