अत्यंत आवश्यकता असेल तरच नागरिकांनी कार्यालयात यावे !

‘कोरोना’चा संसर्ग टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश दूरध्वनी, ई-मेलद्वारे नागरिकांच्या तक्रारी, निवेदन स्वीकारणार

0
233

वाशिम, दि. १७ : ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. लोकांनी एकत्र येवून गर्दी केल्यास या विषाणूचा फैलाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांची गर्दी होवू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून अत्यंत आवश्यकता असेल तरच नागरिकांनी कार्यालयात यावे. अन्यथा शासकीय कार्यालयात येणे टाळावे, असे आदेश कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे नोडल अधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी हृषिकेश मोडक यांनी दिले आहेत. तसेच सामुहिक निवेदने, अर्ज, तक्रारी, फिर्याद कार्यालयास प्रत्यक्ष येवून सादर करून नये, असेही या आदेशात म्हटले आहे.

‘कोरोना’चा फैलाव टाळण्यासाठी गर्दीवर प्रतिबंध करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी होवून या विषाणूचा प्रादुर्भाव होवू नये, यासाठी सुरक्षिततेच उपाय म्हणून जिल्ह्यातील नागरिकांनी प्रत्यक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात न येता आपली निवेदने, अर्ज, तक्रारी, फिर्याद [email protected][email protected][email protected] किंवा [email protected] या ई-मेलवर किंवा ८३७९९२९४१५ या व्हाटसअप क्रमांकावर पाठवावी अथवा वैयक्तिक अर्ज, निवेदन, तक्रार, फिर्याद जिल्हाधिकारी कार्यालयात परस्पर द्यावी. सामुहिक निवेदने, अर्ज, तक्रारी, फिर्याद प्रत्यक्ष येवून सादर करण्यात येवू नये. नागरिकांना काही अडचणी असल्यास त्यांनी ०७२५२-२३३४००, ०७२५२-२३३६५३, ०७२५२-२३२८५८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा दंडाधिकारी यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.