
लाखनी,दि.18ः- 2021च्या जनगणनेत ओबीसींची ओबीसींची म्हणून जनगणना व्हावी व जनगणना पत्रकात ओबीसींचा एससी ,एसटी प्रमाणे ओबीसींचा स्वतंत्र कॉलम असावा याकरिता लाखनी ओबीसी संघटनेच्यावतीने तहसीलदा विरानी यांच्या मार्फेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठविण्यात आले.
लाखनी तहसिल कार्यालयासमोर 17 मार्चला ओबीसी संघटनांच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.परंतु कोरोना या आजाराचे कारण दाखवून तहसीलदार लाखनी यांनी धरणे आंदोलनाची परवानगी नाकारल्याने देशहीत व समाजस्वास्थ्य लक्षात घेऊन ओबीसी संघटनांनी धरणे आंदोलन मागे घेतले.ओबीसी जनगणना 2021 ला झालीच पाहिजे अन्यथा ओबीसी बांधव जनगणनेला सहकार्य करणार नाही असा इशारा ओबीसी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.यावेळी निवेदन देतांना जनगणना परिषदेचे जिल्हा समन्वयक व ओबीसी सेवा संघ लाखनीचे तालुका अध्यक्ष प्रा.उमेश सिंगनजुडे,जनगणना परिषद लाखनी तालुका अध्यक्ष आनंदराव उरकुडे,उपाध्यक्ष रशेषकुमार फटे,सचिव विकास गायधनी,कार्याध्यक्ष यादवराव गायकवाड,कोषाध्यक्ष ईश्वरदास राणे,किशोर कठाने,जि.प.मुरमाडी सर्कल प्रमुख सुनील चाफले,लाखोरी सर्कल प्रमुख रविभाऊ सिंगनजुडे,माजी जि.प. सदस्य उमरावजी आठोळे,माजी जि.प. सदस्य जयकृष्णजीं फेंडंरकर,धनपाल बोपचे उपस्थित होते.