अर्जुनी मोरगाव,दि.20ःः तालुक्यातील ग्रामपंचायत दाभना येथे कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाययोजना व जनजागृती उपक्रम 19 मार्चला पूर्वनियोजित लग्नसोहळ्यात वर, वधू व वऱ्हाडींना ग्रामपंचायत दाभना व पंचायत समिती अर्जुनी/मोरच्या वतीने मास्कचे वितरण करून राबविण्यात आले. कोरोना विषाणू बाबद खबरदारी व प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबद मार्गदर्शन करण्यात आले. सरपंच डॉ. दीपक रहेले व विस्तार अधिकारी अनुपकुमार भावे यांनी वधू व वराचे कुटुंबियांशी आधीच संपर्क साधून सदर विवाहसोहळा हा कमीत कमी गर्दीत साजरा करण्याकरिता समुपदेशन केल्याने सर्वांच्या सहकार्याने अतिशय अल्प उपस्थितीत विवाह सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी सरपंच डॉ. दिपक रहेले, विस्तार अधिकारी अनुपकुमार भावे, उपसरपंच व सर्व सदस्य उपस्थित होते. सर्वत्र या उपक्रमाचे कौतुक होत आहे…