गोंदिया,दि.20ः- कोणताही उद्योग सुरू करतांना संबंधित विभागाच्या वतीने प्रदुषणाचे मानक ठरवून देण्यात येतात जेणे करून त्या परिसरात राहणा-या नागरिकांना त्याचा; ़त्रास होणार नाही. ही अपेक्षा असते मात्र, गोंदिया येथील भगतसिंह वार्ड मरारटोली परीसरात एका अगरबत्ती कारखान्याचा धुळ मुळे होणारा प्रदुषण हा येथील कायम रहीवासी नागरिकांच्या आरोग्यास घातक ठरू लागला आहे. त्याअनुशंगाने परिसरातील नागरिकांनी सदर प्रकार नियंत्रणात यावा व प्रदुषणमुक्त वातावरण रहावे यासाठी प्रधान सचिव, प्रदुषण विभाग नागपुर, गोंदिया जिल्हाधिकारी, सीओ नगर परिषद गोंदिया, जिल्हा पोलीस अधिक्षक गोंदिया यांना निवेदन दिले आहे.
स्थानिक भगतसिंह वार्ड मरारटोली येथे संचालक अभिलेख गणेश अग्रवाल यांची जय अंबे इंन्डस्ट्रिज व संचालक कमलेश मुकुंदीलाल अग्रवाल यांची एल.एम.एन. या दोन अगरबत्ती कारखाने चालविण्यात येत आहे. तेथे अगरबत्ती साठी काळया कोळसाचा पावडर तयार केला जातो. त्यात हिरडा, बेडा लाकडाची साल हे मिक्स करून मशिनीव्दारे पावडर तयार करतात. आणि ती धुळ संपुर्ण भंगतसिंग वार्डातील प्रत्येक घरी पसरते. त्यामुळे वार्डातील सर्व लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. तसेच लहान मुलांना याचा खुप त्रास होत आहे. अगरबत्तीचा धुळ घरोघरी जात असल्यामुळे त्या वार्डातील घरे सुध्दा काळी-काळी व खराब होत आहे. याशिवाय मशिनचा खुप मोठा कर्कश आवाज होत असल्याने रात्री झोपणेही अवघड झाले आहे. याशिवाय हवा सुटल्यास तंबाखु सारखा वास घराघरात जातो. या प्रकाराला घेवुन परीसरातील नागरिकांनी या जिवघेण्या प्रदुषणावर नियंत्रणासाठी काहीतरी उपाययोजना करा असे वारंवार जावुन कारखाना मालक अभिलेख अग्रवाल व कमलेश अग्रवाल यांना सांगितले. परंतु, कारखाना मालक लक्ष देत नसल्याने परीसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सध्या देशात कोरोना संसर्गजन्य आजाराची दहशत निर्माण झाली आहे. सर्वत्र स्वच्छतेचा संदेश देण्यात येत आहे. मात्र, प्रदुषण विभागासह कारखाना मालकाचे या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष असल्याने भगतसिंह वार्ड मरारटोली परिसरात आरोग्याला घेवुन बिकट परिस्थती निर्माण झाली आहे. तेव्हा कारखाना मालकाने प्रदुषण नियंत्रण विभागाचे मानक अमलात आणावे व प्रदुषणामुळे होणारी समस्या दुर करावी या मागणीला घेवुन परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिका-यासह प्रदुषण विभाग, सीओ नगरपरिषद गोंदिया, जिल्हा पोलीस अधिक्षक गोंदिया यांना निवेदन दिले आहे. तसेच सदर कारखाना दुस-या ठिकाणी हलविण्यात यावा अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातुन करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी परिसरातील सुमन नरेश चैधरी, मुन्नी शंकर माने, उनिता माने, मंगला पंचम माने, यशोदा भोयर, सुनिता कुथे, मनिषा राउत, बेबी समल दास, मिना पाल, सविता नागदिवे, मृणालिनी नागदिवे, उमा नागदिवे, आशा भोसकर, संतोषि अगळे, पंचफुला मराठेे, रेखा कुथे, बबली बरईकर, सुनिता माने, सविता शिल्लारे, शिल्पी सरकार, वैशाली सापके, आदी भगतसिंह वार्डातील शैकडो महिला उपस्थित होते.
अगरबत्ती कारखाण्याच्या प्रदुषणाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात
भगतसिंग वाॅर्ड मरारटोली परिसरातील प्रकार