मोहाडी,दि.21ः- शहीद अमर विरांगणा राणी अवंतीबाई लोधी यांचा १६२ वा बलिदान दिवस मोहाडी तालुक्यातील सालई खुर्द येथे २० मार्च रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सर्वप्रथम राणी अवंतीबाई यांच्या प्रतिमेला पुष्प गुच्छ अर्पित करून माल्यार्पण करण्यात आले.यावेळी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नितीन लिल्हारे, ईश्वर लिल्हारे, बबलू सव्वालाखे, शैलेश लिल्हारे, धनश्याम अटराहे,शिवदास लिल्हारे, बबलू सव्वालाखे, रामप्रसाद बघेले, भीमा ठाकरे, नरेश नागपुरे, रोशन अटराहे आदी उपस्थित होते.