नप स्वच्छता कर्मचाèयांना मास्क, हातमोजे वितरीत

0
77

गोंदिया,दि.२1 :वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता हे सुदृढ आरोग्यचे प्रतिक आहे. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता प्रत्येकजण स्वच्छतेकडे लक्ष देत आहे. सार्वजनिक स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या नगर पालिका स्वच्छता कर्मचाèयांचे आरोग्य या कालावधीत अबाधीत राहावे, व कोरोना विषाणूवर प्रतिबंधकात्मक उपाय म्हणून स्वच्छता कर्मचाèयांना मास्क व हातमोज्यांचे वितरण करण्यात आले.
वैश्विक आापदा झालेल्या कोरोना विषाणूच्या प्रसारावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासन व प्रशासन स्तरावरून नानाविध उपाय योजना केल्या जात आहेत. येथील नगर पालिका अंतर्गत शेकडो स्वच्छता कर्मचारी कार्यरत आहेत. सध्या मोठ्या प्रमाणात कारोना विषाणूच्या प्रसाराने सर्वत्र जनतेत भिती निर्माण झाली आहे. शहरातील सार्वजनिक स्वच्छतेचा दररोज प्रत्यक्ष संपर्क येणाèया नगर पालिकेच्या स्वच्छता कर्मचाèयांना बाधा होऊ नये आणि प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नगरपालिकेच्या स्वच्छता विभागातर्फे नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्या दालनात त्यांच्या हस्ते १२६ स्वच्छता कर्मचाèयांना मास्क व हात मोज्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी विभाग प्रमुख गणेश हतकिया, समन्वयक प्रतिक मानकर, मुकेश शेंद्रे, मनिष दहिसाल, प्रकल्प पानतवणे, सुमित शेंद्रे यांच्यासह नप कर्मचारी उपस्थित होते.