२१ मार्चपर्यंत जिल्ह्यात ‘कोरोना’चा एकही रुग्ण नाही

0
194

गोंदिया, दि. २१ : जिल्ह्यात आज, २१ मार्चपर्यंत  ९२ जण विदेशातून प्रवास करून आले आहेत. तसेच या व्यक्तींच्या संपर्कात आलेले ३६७ व्यक्ती आढळून आल्या आहेत. अशा एकूण ४५९ व्यक्तींना त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी अलगीकरण करून देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. यापैकी ५ व्यक्तींचे वैद्यकीय तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या व्यक्तींची दररोज तपासणी करण्यात येत असून कोणत्याही व्यक्तीमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची लक्षणे आढळलेली नाहीत. अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संगीता पाटील यांनी दिली.