देवरी/अर्जुनी-मोर(संतोष रोकडे/विनायक राखडे/भरत हलमारे)ःः देशातील वाढत्या कोरोनाच्या प्रभावाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात ‘जनता कर्फ्यू’ लावला आहे. आज देशभरातील सर्व दुकान, मॉल्स, कंपन्या इत्यादी गोष्टी बंद राहणार आहेत. तसेच, पंतप्रधानांनी जनतेलाही घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले होते त्यास गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव व देवरी तालुक्यात 100 टक्के प्रतिसाद जनतेने देत सहभाग नोंदविला. गोरेगाव,तिरोडा ,देवरी व अर्जूनी मोर तालुका स्थळ असून सुद्धा रस्त्यावर वर्दळ मुळीच नव्हती हॉटेल दुकान किराणा दुकान भाजीपाला मार्केट,पेट्रोल पंप,मेडीकल दुकान,देशी दारू दुकान, वाईन शॉप एकंदरीत शंभर टक्के बंद होते.बस स्थानक रेल्वे स्टेशन येथे सुद्धा एकही प्रवासी आढळला नाही.देवरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर असून येथेही एकही वाहन धावले नाही.
शेतामध्ये कोणीही शेतकरी गेलेला नाही तसेच निंदनचे कामेसुद्धा करण्यासाठी महिला मजूर शेतामध्ये गेलेल्या नाहीत.
शहरासह ग्रामीण भागात रस्ते संपूर्णतः ओस पडली होती जनतेने आपल्या घरात राहून जनता कर्फ्यू ला 100 टक्के अर्जुनी-मोर तालुक्यासह परिसरात कर्फ्यू मुळे मनुष्य घराबाहेर पडल्याच नाही, 100% कर्फ्यु लावण्यात आला परिसरातील चान्ना,बाक्टी,गुढरी सोमल्पुर, इंजोरी, पिंपळगाव खांबी, निमगाव ,बोंडगाव देवी, देऊळगाव ,बोदरा ,विहीरगाव, शिलेझरी ,टोला डोंगरगाव , बीड भूरशी ,अरत्तोंडी ,दाबना ,या गावात कर्फ्यू पाडल्यामुळे रस्त्यावरती कोणी फिरताना दिसलेच नाही.दोन दिवसापासून दुधाचा व्यवसाय बंद ठेवल्यामुळे परिसरातील दूध बाहेर गेले नाही त्यामुळे ग्रामीण भागात दुधाची गंगा वाहिली. एकंदरीत पाहता सकाळपासूनच रस्त्यावर कोणी भटकताना दिसलेले नाही. माणस आपापल्या घरात एकांतवासात होते .मुकरू मेश्राम यांच्या घरी 22 मार्च ला दोन मुले दोन मुली चा सामूहिक विवाह सोहळा रद्द करण्यात आला .