रोहयोच्या कामावर राहणार आता 25 मजूर

0
392

गोंदिया,दि.२3: जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विविध प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे.जिल्ह्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामीण भागात सुरू असणाऱ्या कामावर साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत 25 पेक्षा जास्त मजूर उपस्थित राहणार नाही याबाबत आवश्यक खबरदारी व दक्षता घेण्यात यावी त्याचप्रमाणे कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना पाळल्या जातील याची प्रत्येक कामाच्या ठिकाणी दक्षता घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिले आहे.आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध कलम १८८नुसार कारवाई करण्यात येईल.