भीमनगर येथे स्थापनादिनानिमित्त महामानवाला अभिवादन

0
111

गोंदिया,दि.23 : समता सैनिक दल, संविधान मैत्री संघ व एसीएसकेच्या वतीने समता सैनिक दलाचा स्थापना दिवस स्थानिक भिमनगर मैत्रीय बुद्ध विहार येथे साजरा करण्यात आला. याप्रसंगी समता सैनिक दलाचे संस्थापक सेनापती यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेजवळ दीप प्रज्वलन व माल्यापंर्ण करून अभिवादन केले. तद्नंतर समता सैनिक दलातर्फे सलामी व मानवंदना देण्यात आली. मुकेश माने यांनी स्वयंस्फुतीर्ने समता सैनिक दलातील सैनिकांच्या गणवेषाकरिता कापड प्रदान केले. याप्रसंगी समता सैनिक दल कमांडर राजहंस चौरे, प्रचारक किरण वासनिक, ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळचे वसंता गवळी, आंबेडकरी चळवळीचे संस्कार केंद्र संचालक महेंद्र कठाने, सर्वसमाज जयंती समितीचे संयोजक पुरुषोत्तम मोदी, संविधान मैत्री संघाचे अतुल सतदेवे, बनारस हिंदू यूनिवर्सिटी विद्यार्थी शुभमकुमार, मैत्रीय बुद्ध विहार समितीचे विमल मेश्राम, लक्ष्मी राऊत, अरुण चव्हाण, प्रकाश वासनिक, चाहत मेश्राम, अंशुल राऊत, गौरव कोल्हाटकर, शुभम नागरिकर, अंगद भालाधरे, शिमोन भालाधरे, विदिशा गजभीये, समीक्षा रामटेके, प्रणाली मेश्राम, श्रेया रामटेके, श्वेता टेंभुर्णीकर, प्रतीक्षा भैसारे, ऋषभ भैसारे, उमेश रिनाईत, रुशाली रिनाईत, पारस चव्हाण, श्रावणी पानतवने, धीरज बावने, उत्कर्ष मेश्राम, श्रद्धा गजभिये, नंदिनी बन्सोड, आर्यन बन्सोड, प्रथम टेंभुर्णे, श्रीकांत रंगारी, रॉकी सुर्यवंशी, टिनू बागडे, अनुराग बागडे, रिशिल, त्रिशा, प्रीती बागडे, मुस्कान सहारे, नेहा नागदवने, आंचल शहारे, आकाश शहारे, धम्मदीप वैद्य, पायल बन्सोड, स्विटी उके, कशिश शहारे, रचना गडपायले, आदिती रिनाईत आदी उपस्थित होते.