कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेने सुचनांचे पालन करावे-शिल्पा सोनाळे

0
247

अर्जुनी-मोर(संतोष रोकडे)दि.23ः-कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 22 मार्चला जनता कर्फ्यू जनतेने शंभर टक्के यशस्वी केला.त्यानंतरही आपल्याला काळजी घेऊन कोरोणाचा प्रादुर्भाव कायमस्वरूपी रोखण्यासाठी प्रशासन सजग असून प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे जनतेने काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाळे यांनी केले आहे.उपविभागीय अधिकारी कार्यालयात कोरोणा प्रादुर्भाव रोखण्यासंबधी आयोजित पत्रकारपरिषदेत त्या बोलत होत्या.यावेळी तहसीलदार विनोद मेश्राम,नायब तहसीलदार गेडाम,ठाणेदार महादेव तोंडले उपस्थित होते.

रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपंचायत तसेच ग्रामीण भागात कलम 144 लागू करण्यात आली असून जनतेने पाचपेक्षा अधिकच्या संख्येने गोळा होऊ नये.आपल्या गावात किंवा शेजारी विदेशातून व्यक्ती आलेला असेल,किंवा मुंबई पुण्यावरुनही गावात आलेला असेल किंवा कुणाशी संपर्क झालेला असल्यास त्या व्यक्तीची माहिती प्रशासनाला देऊन सहकार्य करण्याचे आवाहनही श्रीमती सोनाळे यांनी केले.जिल्ह्यात कलम 144 लागू असले तरी अत्यावश्यक सेवेत किराणा सामान, फळे, भाजीपाला, दूध, क्लिनिक, पेट्रोल पंप सुरू राहणार असून शासकीय कार्यालयात पाच टक्के कर्मचारी प्रत्येक कार्यालय प्रमुखाने उपस्थित ठेवावे.तसेच कार्यालय प्रमुखांनी ई-मेल आयडी व व्हाट्सअप व्दारे संपर्क करून जनतेची कार्यालयीन कामे करावे जेणेकरुन जनता कार्यालयात येणार नाही आणि गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.आपल्या भागात परदेशातून आत्तापर्यंतडे तीन नागरिक आलेले आहेत मात्र त्यांच्यात काही आढळून आले नाही.ताप,सर्दी,खोकला आढळून आल्यास लगेच दवाखान्यात उपचार घ्यावे यासाठी तालुकास्तरावर समन्वय समिती नेमण्यात आल्याचेही सांगितले.ग्रामपातळीवर सुद्धा समिती नेमली असून एकही कोरोना बाधित उपविभागात नसल्याचे त्या म्हणाल्या.प्रशासनाच्या सूचनांचे जनतेने पालन करावे अन्यथा आयपीसी अन्वये गुन्हे दाखल करावे लागतील असे सांगतच येगाव व वडेगाव या उपकेंद्रात विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती दिली. जनतेने वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ धुवावे तसेच नगरपंचायत व ग्रामपंचायत यांना फाॅगिंग मशीनद्वारे फवारणी करण्याच्या सूचना दिल्या.कोणत्याही सामानाची साठाबाजी जनतेने करू नये तसेच वाढीव दर घेऊ नये असे करताना आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच विनाकारण जनतेने प्रवास करणे टाळावे महत्त्वाचे काम असल्यासच घराबाहेर निघावे असेही सोनाळे यांनी सांगितले.