गोंदिया दि. 23 जिल्ह्यात कोरोना विषाणू(कोव्हिड 19) चा संसर्ग रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत जिल्हाधिकारी यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे.या कायद्यातील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना एका आदेशाद्वारे जारी केली आहे.
गोंदिया जिल्ह्यात मास्क आणि सॅनिटायझरची उपलब्धता व विक्री योग्य किमतीत होतेे किंवा नाही याची पडताळणी करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्याअध्यक्ष डॉ. कादंबरी बलकवडे यांनी एका आदेशाद्वारे पथक गठित केले आहे.यामध्ये पथक प्रमुख म्हणून औषध निरीक्षक प्रशांत रामटेके
( 90 28 670024) व वैधमापन निरीक्षक श्री मूल (94 22 811 887)हे असून पुरवठा निरीक्षक या पथकामध्ये सदस्य आहे. त्यांना नेमून दिलेला तालुका पुढील प्रमाणे गोंदिया तालुका- श्री वैभव तोंडे( 9070997611) तिरोडा तालुका- श्री जीवन राठोड (9096661506) गोरेगाव तालुका-श्री समीर मिर्झा(9767374746) आमगाव तालुका- श्री मिथुन ठाकरे (9763050795) सालेकसा तालुका- श्री दुधराम बावनकर
(9673 883631)देवरी तालुका- श्री शैलेश झोडापे (9049219804 ), अर्जुनी/ मोरगाव तालुका- श्री भूषण राऊत
(9890587230) आणि सडक/अर्जुनी तालुका- श्री संतोष उईके
(9623840066) यांनी दररोज मास्क व सॅनिडायझरची दररोज उपलब्धता आणि विक्री योग्य किमतीत होत आहे किंवा नाही याबाबतची तपासणी करून अहवाल दररोज सादर करावा.या कामांमध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होणार नाही याची सर्वतोपरी दक्षता घ्यावी असे आदेशात नमूद केले आहे.