भंडारा जिल्हयात सोळा व्यक्ती होम क्वारंटाईन देखरेखीखाली

तर अलगीकरण कक्षात चौदा व्यक्ती

0
317

भंडारा,दि. 23 :- भंडारा जिल्हयातील विदेशातून परत आलेल्या तीन व्यक्तीची नोंद घेण्यात आल्याने  रॅपीड रिस्पांस टीमने भेट दिलेल्यांची संख्या 30 झाली आहे. त्यापैकी सोळा व्यक्तींना होम क्वारंटाईन देखरेखीत ठेवण्यात आले असून चौदा व्यक्तींना नर्सिंग होस्टेल येथील अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

विदेशातून आलेल्या 30  सहवासितांना प्राऊड टू प्रोटेक्ट भंडारा होम क्वचारंटाईन  हे स्टॅम्प मारण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष दोन तयार करण्यात आले असून जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक 07184-251222 व जिल्हा सामान्य रुग्णालय -क्रमांक 07184-252247 आणि  आरोग्य विभाग, जिल्हा परिषद भंडारा क्रमांक 07184-252317 यावर संपर्क साधावा.