विदेशातून १२१ जण जिल्ह्यात दाखल, ६२९ व्यक्तीं होम क्वारंटाईन

‘कोरोना’चा एकही रुग्ण नाही

0
226

गोंदिया, दि. २३: जिल्ह्यात आज, २३ मार्चपर्यंत १२१ जण विदेशातून प्रवास करून आले आहेत. तसेच या व्यक्तींच्या संपर्कात आलेले ५०८ व्यक्ती आढळून आल्या आहेत. अशा एकूण ६२९ व्यक्तींना त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी अलगीकरण करून देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. यापैकी ५ व्यक्तींचे वैद्यकीय तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या व्यक्तींची दररोज तपासणी करण्यात येत असून कोणत्याही व्यक्तीमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची लक्षणे आढळलेली नाहीत अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक गोंदिया यांनी दिली.दरम्यान होमक्वारटांईनमध्ये असलेल्या 1 व्यक्तीने जिल्हाप्रशासनाची बाब न एैकता घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केल्याने त्याला शासकीय क्वारटांईनमध्ये पाठविण्यात आल्याची माहितीही देण्यात आली आहे.