गडचिरोली जिल्हा परिषदेने केली व्हॉटस अॅपवर तक्रारी पाठविण्याची सोय

0
98

गडचिरोली,दि.२४: कोरोनासंदर्भात सरकारने कार्यालयातील गर्दी कमी करण्याचे निर्देश दिल्यानंतर गडचिरोली जिल्हा परिषदेनेही त्याअनुषंगाने पावले उचलली आहेत. जिल्हा परिषदेंतर्गत सर्व कार्यालयांतील एकूण कर्मचाऱ्यांच्या ५ टक्के कर्मचारीच उपस्थित राहतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच बाहेरच्या कोणत्याही जिल्हा परिषद कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही. नागरिकांनी प्रत्यक्ष कार्यालयात न येता आपल्या तक्रारी ९४०३००९९७६ या व्हॉटस अॅप क्रमांकावर किंवा [email protected] तसेच [email protected] वर पाठवाव्या.. महत्वाच्या तक्रारी प्राधान्याने निकाली काढल्या जातील, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतीरकर यांनी सांगितले.