सडक अर्जुनी,दि.25ः- ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सजग असायला पाहिजे.मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्यक्ष भेटी दिल्यानंतर तेथील वास्तव वेगळेच आहे.जिल्हा परिषदेने प्रा आ केंद्रांसाठी जिल्हा निधीतून पाच लक्ष रुपये देण्याची मागणी जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी जि प अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाèयांची भेट घेत केली.
दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दखल घेत आरोग्य विभागाला यासंदर्भात फाईल सादर करण्याचे निर्देश दिले.यावेळी जि.प.सदस्य किशोर तरोणे व अर्जुनी मोरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष लोकपाल गहाणे हे सोबत होते.
सद्या कोरोना विषाणूंचा संसर्ग होण्याची भीती सर्वत्र व्यक्त केली जात आहे.राज्यात कोरोना बाधित व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.केंद्र व राज्य शासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्रात पर्याप्त सोयीसुविधा आहेत का याची शहानिशा करण्यासाठी परशुरामकर यांनी खोडशिवनी, डव्वा व शेंडा प्रा आ केंद्राला सोमवारी भेट दिली.
वैद्यकीय अधिकाèयांशी चर्चा केली.त्यात प्राथमिक उपाययोजना म्हणून मास्क व स्वच्छतेच्या दृष्टीने सॅनिटायजर असणे आवश्यक आहे.मात्र शासनाने अद्याप पुरवठा केलेला नाही.त्यामुळे रुग्णालयात येणाèयाना सतर्कता बाळगता येत नाही.रुग्ण व त्यांच्यासोबत रुग्णालयात आलेल्यासाठी हात धुण्याची व्यवस्था केवळ खोडशिवनी केंद्रात दिसून आली.इतर केंद्रात अशी व्यवस्था दिसून आली नाही.यावरून प्राथमिक व्यवस्थेकडे जि प आरोग्य विभागाचे दुर्लक्ष दिसून येते.आरोग्य व पोलीस विभागात समन्वय नसल्याचा त्यांनी आरोप केला आहे.डव्वा आरोग्य केंद्र परिसरात विदेशातून काही स्थानिक लोकं आली आहेत.
त्यांना शासन निर्णयामधील तरतुदीनुसार उपाययोजनाची काळजी आरोग्य विभागाने घेतली मात्र पोलीस विभागाने त्यांना ग्रामीण रुग्णालयात बोलावून चूक केल्याचे त्यांनी सांगितले. त्याचे कारण सांगतांना ते म्हणाले,या विदेशातून आलेल्या इसमांंना स्पर्श १४ दिवसपर्यंत घरीच बंदिस्त ठेवायचे असले तरी पोलिसांनी त्यात खोडा घातल्याचा आरोप परशुरामकर यांनी केला आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रात मास्क व सॅनिटायजर साठी पाच लक्ष रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी जि प अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे पत्र देऊन केली आहे.