गोंदिया,दि.२५: जिल्ह्यात २५ मार्चपर्यंत १३२ जण विदेशातून प्रवास करून आले आहेत. तसेच या व्यक्तींच्या संपर्कात आलेले ६१४ व्यक्ती आढळून आल्या आहेत. अशा एकूण ७४६ व्यक्ती देखरेखीखाली असून त्यापैकी एकूण ७४४ व्यक्तींचे त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी अलगीकरण करून देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. यापैकी ७ व्यक्तींचे वैद्यकीय तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या व्यक्तींची दररोज तपासणी करण्यात येत असून कोणत्याही व्यक्तीमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची लक्षणे आढळलेली नाहीत.६९ प्रवाशांचा शासकीय विलगीकरणाचा आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या २४३ व्यक्तीचा कालावधी संपला असल्याची आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक गोंदिया यांनी दिली.
दरम्यान दिवसेंदिवस विदेशी प्रवाशांच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यातच लाॅकडाऊन झालेले असतानाही जिल्ह्यातीलच नव्हे तर शहरातील शिक्षित जनताच कायद्याला मोडून काढत बाहेर फिरताना दिसून येत असून दुकांनावर दिलेल्या सुचनांचे पालन करीत नसल्याचे चित्र गोंदिया शहरात बघावयास मिळाले.किराणा दुकानावर 1 मीटरच्या अंतरावर उभे असावे अशा सुचना अनेकदा दुकानदार देत असतानाच शिक्षित व्यक्ती यामध्ये शासकीय नोकरीवर असलेले बहुतांश त्याचे पालन करतांना दिसून आले नाही.