गडचिरोली,दि.25 : ज्याअर्थी COVID-१९ या संसर्गजन्य आजाराच्या प्रसाराला प्रतिबंध होण्यासाठी आदेशाअन्वये आपत्ती व्यवस्थापन कायदाचे कलम १०(२-१) मिळालेल्या अधिकारान्वये अध्यक्ष राष्ट्रीय कार्यकारी समिती यांनी केंद्र शासनाचे मार्गदर्शक तत्वे निर्गमित केलेले आहे. या मार्गदर्शक तत्वांची दिनांक २५ मार्च पासुन पुढिल २१ दिवस सक्तीने अमंलबजावणी करण्याचे आदेशीत केलेले आहे. तसेच दिनांक २५ मार्च पासुन पुढिल २१ दिवस संपुर्ण देशात लॉक डाऊन जाहिर केलेले आहे. या मार्गदर्शक तत्वानुसार तहसिलदार हे त्यांच्या कार्यक्षेत्रात आता इन्सिडन्ट कंमाडर म्हणून आदेशित केलेले असुन त्यांच्या कार्यक्षेत्रात लॉक डाऊन स्थितीची सक्तीने अंमलबाजवणी करण्याची जबाबदारी त्यांचेवर दिलेली आहे.
त्याअर्थी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तहसिलदार यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात उक्त केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वाचे
जनतेकडून कटेकोरपणे पालन करुन घेण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात याव्या. तसेच COVID-१९ या संसर्गजन्य आजाराचे प्रसाराचे प्रतिबंधासाठी या कार्यालयाकडुन या पुर्वी विविध आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे. त्यांची देखिल अमंलबजावणी तहसिलदार यांनी करणे अनिवार्य राहिल.
केंद्र शासनाचे उपरोक्त मार्गदर्शक तत्वे व या कार्यालयाचे आदेशान्वये वैद्यकीय सेवा, औषधाचे दुकाने, जीवनाआवश्यक वस्तूंची खरेदी विक्री करणे या करीता सवलती दिलेल्या आहेत, त्याच प्रमाणे शासकीय, निमशासकीय कर्यालये व अत्याआवश्यक सेवा देणारे काही खाजगी कार्यालये तेथील अधिकारी कर्मचा-यांना त्यांच्या कर्यालयात जाण्याकरीता देखिल गुभा दिलेली आहे याचे नियमन देखील तहसिलदार यांनी त्यांचे कार्यक्षेत्रात प्रभावीपणे करावे. मात्र कुठल्याही परिस्थीत या रोगाचा प्रसार होणार नाही याची पुरेपुर दक्षता घेण्यासंबधात नियमन करण्यात यावे, यामध्ये जिवनाआवश्यक वस्तुचा पुरवठा सुरळीत पणे सुरु राहील व
जिवनावश्यक वस्तु, औषधाचा साठा, संबंधित दुकानांमध्ये पुरेसा उपलब्ध असल्याची व त्याचा काळाबजार होत नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी तहसिलदार यांची राहिल. अत्यावश्यक सेवा व जीवनाआवश्यक वास्तूंचा पुरवठा, आवश्यक सेवेतील कर्माचा-यांची ने आन करणे इत्यादी वाहनांच्या वाहतुकीचे देखील नियमन तहसिलदार यांनी त्यांच्या स्तरावर करावे. यामध्ये दुस-या राज्यातून किंवा दुस-या जिल्ह्यातून देखिल वाहनांचा समावेश राहिल. या शिवाय अत्यावश्यक कामाकरिता तहसिलदार यांच्या कार्यक्षेत्रातील लोकांना इतरत्र जाणे अनिवार्य आहे किंवा इतरत्र राहत आसेलेली जनता अपरिहार्य कारणामुळे संबंधित तहसिलदार यांच्या कार्यक्षेत्रात येत असतील तर त्यांचेदेखील नियमन संबंधित तहसिलदार यांनी करावे.
तहसिलदार यांना COVID-१९ या रोगाचा प्रसार होउ नये या करिता त्यांच्या कार्यक्षेत्रातिल वैद्यकिय अधिकारी, पोलिस अधिकारी, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी तसेच त्यांचे कार्यक्षेत्रातील ज्या अधिकारी/कर्मचारी यांच्या सेवा घेणे अत्यावश्यक वाटते त्या सर्व अधिकारी/कर्मचारी यांच्या सेवा अधिग्रहित करण्याचे अधिकार असतील व ज्यांच्या सेवा अधिग्रहित केल्या आहेत त्यांनी कोणत्याही प्रकारचे कामचुकार केल्याचे तहसिलदार यांचे निदर्शनास आल्यास तहसिलदार हे त्या संबधित अधिकारी /कर्मचारी विरोधात गुन्हा दाखल करु शकतील.