
गोंदिया,दि.26ः जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरू आहे. संचारबंदीच्या काळातही विनापास परवाना अवैधरित्या रेती तस्करी करणाNयावर पोलिसांनी मोठी कारवाई करून विविध घटनेत २५ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस उपअधीक्षक गृह यांच्या अखत्यारित तयार करण्यात आलेल्या पथकाने २४ मार्च रोजी ३ ट्रॅक्टरवर केलेल्या कारवाई एवूâण १० लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. फिर्यादी पो.ना. दुर्गाप्रसाद कनोजे यांच्या तक्रारीवरून
पोलिसांनी गुन्हा नोंद केला. घटनेतील तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर याच दिवशी रावणवाडी पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या ३ कारवाईत एवूâण १५ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. जप्त केलेल्या
मालामध्ये ट्रॅक्टर, ट्रॅक्टर ट्रॉली, रेती, मोबाईल असा साहित्य आहे. सर्व कारवाईत पोलिसांनी २५ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या घटनेतीलही सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस
अधीक्षक मंगेश शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. कनोजे, पो.सि. अशोक साबडे आदींनी पार पाडली.