प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधाचा तुटवडा

0
114

लाखांदूर,दि.26ः : कोरोना व्हायरस या रोगाने संपूर्ण जगातील देशांना हादरवून सोडले आहे.भारतातही या कोरोना व्हायरसचा मोठ्या संख्येने प्रादुर्भाव होत असून एकटे महाराष्ट्र राज्यात १०९च्या आसपास कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आहे. यात रोजच रुग्णांची संख्या वाढतांना दिसून येत आहे. या कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी केंद्रसरकारसह सर्वच राज्यसरकारांनी वंâबर बसली असून देशात २१ दिवसाची संचारबंदी लावण्यात आली आहे. या कोरोना व्हायरसचा ग्रामीण भागातील जनतेनही धसका घेतल्याचे दिसून येत आहे.शासनाच्या वतीने अत्यआवश्यक व जिवनावश्यक वस्तूची दुकाने खुली राहतील असे सांगण्यात आले व सुरुही आहेत. बारव्हा येथे प्राथमिक आरोग्य वेंâद्र आहे. या वेंâद्राअंतर्गत अठरा ते विस गावांचा समावेश येतो. या सर्व गावातील रुग्ण या आरोग्यकेंद्रात उपचाराकरीता रोजच येत असतात. मात्र या आरोग्यवेंâद्रात कधी डॉक्टर,कर्मचारी हजर राहत नाही तर कधी औषधीच मिळत नाही अशी स्थिती आहे. हे २४ तासांचे आरोग्यवेंâद्र आहे. मात्र हे वेंâद्र कितीतास उघडे असते हेच जनतेला माहित नाही.सध्या कोरोना व्हायरस या विषाणूजन्य रोगाने नागरिकांच्या मनात धडकी भरविली असून नागरिक दहशतीखाली जिवन जगत आहेत. अशातच साधी सर्दी व ताप जरी आला तरी प्राथमिक आरोग्य वेंâद्राकडे नागरिक घाव घेत असतात मात्र या रुग्णालयात मुख्यालयी ठिकाणी डॉक्टरच राहत नाही. त्यामुळे रुग्णांना ताटकाळत उभे हावे लागते. शासनाने अत्यआवश्यक सेवा म्हणून सर्वांना मुख्यालयी ठिकाणी राहण्याचे आदेश दिले मात्र शासनाच्या आदेशाला धुडकावून येथील कर्मचारी वागत असल्याचे दिसून येत आहे. या आरोग्य वेंâद्रात औषधांचा सॅनिटायझर,मॉक्स आदींचा तुटवडा असून या वेंâद्रात शासनाने त्वरित औषधांचा पुरवठा करावा तसेच हे प्राथमिक आरोग्य वेंâद्र २४ तास सुरु ठेवण्यात यावे व येथे डॉक्टरांसह कर्मचारी यांनी आळीपाळीने २४ तास सेवा द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.