छत्तीसगडच्या सीमेवरील ककोडी परिसरात मीठाचा तुटवडा

0
777
छत्तीसगड सीमेवरील गावात मीठासाठी अशी गर्दी दुकानावर दिसून येते

ककोडी(विनोद सुरसावत)दि.13- शेजारच्या छत्तीसगड राज्यात मीठाचा तुटवडा निर्माण झाल्याने देवरी तालुक्यातील ककोडी चिचगड परिसरासह गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील व्यापाèयांनी मीठाचे भाव प्रचंड वाढविले आहेत. १६० रुपयांना मिळणारी २५ किलोची पिशवी तब्बल ३०० रुपयांना विकली जात असल्याने जनतेला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.१० रुपयाचा असलेला मिठाचा पॅकेट ३०-४० रुपयाला विकला जाऊ लागला आहे.व

देवरी तालुक्याची सीमा छत्तीसगड राज्याला लागून आहे. त्यामुळे या तालुक्यातील जनतेचे नाते आणि व्यावहारिक संबंधही छत्तीसगडशी आहेत. टाळेबंदीच्या काळात छत्तीसगड राज्यात मीठाचा तुटवडा जाणवत असल्याने सीमेशेजारचे नागरिक चिचगड व ककोडी तसेच गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील आपल्या नातेवाईकांना मीठ खरेदी करुन ठेवण्यास सांगत आहेत. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक आपापल्या गावातील दुकानांतून मीठ खरेदी करुन ठेवत आहेत. परिणामी बहुतांश दुकानांतील स्टॉक संपल्याचे सांगण्यात येत आहे. यातूनच आता ककोडी परिसरासह कोरची तालुक्यातही मीठाचा तुटवडा निर्माण झाला असून, १० रुपयाला मिळणारा एक किलो मीठाचा पॉकेट तब्बल ३०-४० रुपयांना विकला जात आहे. यासंदर्भात काही दुकानदारांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, छत्तीसगड राज्याला गुजरात व मुंबईतून मीठाचा पुरवठा होतो. परंतु दोन्ही ठिकाणांहून मीठाचा पुरवठा कमी होत असल्याने छत्तीसगडमध्ये मीठाचा तुटवडा निर्माण झाला आहे.तसेच मिठाचा कारखाना बंद झाल्याचे सांगत पुढे मिठ मिळणार नसल्याच्या अफवेने नागरिकांत संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.राजनांदगाव व गोंदिया येथील मोठ्या व्यापाèयांकडे मीठाची मागणी केली असता त्यांनीही तेथेही मीठाचा तुटवडा असल्याने मागणी पूर्ण करु शकत नसल्याचे सांगितले. त्यामुळे नजीकच्या काही दिवसांत तालुक्यातील नागरिकांच्या अन्न बेचव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान छत्तीसगडच्या आमदार श्रीमती छन्नी चंदू शाहू यांनी लोकांना कुठल्याही अफवेवर विश्वास ठेऊ नये मिठाची कुठेच कमतरता नसल्याचे सांगत अफवा पसरविणाèयावर कारवाई करण्यात येणार असा इशारा दिला आहे.

महात्मा गांधींनी गोरगरीब जनतेला स्वस्त दरात मीठ उपलब्ध व्हावे यासाठी मीठाचा सत्याग्रह केला होता. त्यामुळे स्वांतत्र्याच्या ७३ वर्षाच्या काळात मीठाची किंमत खूप न वाढता ते स्वस्त दरातच उपलब्ध होत राहिले. परंतु टाळेबंदीचे निमित्त करुन व्यापारी गांधीजींच्या मूळ हेतूलाच हरताळ तर फासत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.