भारतीय डाक कर्मचाऱ्यांनी जपली सामाजिक बांधिलकी,गरजूंना धान्यकिटचे वाटप

0
165
गोंदिया,दि.13ः कोरोनाचा संकट दिवसेंदिवस वाढत असून सर्वसामान्यांना याचा फटका बसला आहे.हातमजुरी करून जीवन जगणाऱ्यांना एक वेळच्या जेवणाची सोय करणे अशक्य झाले आहे त्यातच याची जाणीव होताच भारतीय डाक कर्मचारी संघटनेने आपली सामाजिक बांधिलकी जपत गरजूंना धान्य किटचे वाटप करण्यात आले.
भारतीय डाक कर्मचारी संघटनेच्या विभागातील सदस्यांनी  निधी जमा करून गोंदिया जिल्ह्यात विविध भागांमध्ये जाऊन गरजूंना धान्य किट वाटप करण्यात आले.तसेच संघटनेच्या वतीने विदर्भातील सर्व जिल्ह्यात धान्य किट वाटप करण्यात आले.यावेळी संघटनेचे सचिव सहदेव सातपुते,सोविंदराम बागडकर,सतीश निकम,अनिल मेश्राम ,राजू दाखणे, गजानन बेले,योगेश कटरे,सच्चीनानंद निरमोही व संघटनेचे सदस्य ,पदाधिकारी उपस्थित होते.