सडक अर्जुनी,दि.22ःतालुक्यातील सौंदड येथे सरपंचाच्या मनर्मजी कारभाराला कंटाळून व आपल्या न्याय हक्कासाठी तसेच भाजी विक्रेत्याला लावण्यात येणारे नियम अन्य जीवनाश्यक वस्तूंना लावण्यात यावे, या मागणीसाठी भाजी विक्रेत्यांनी सरपंचाच्या घरावर मोर्चा काढून आक्रोष व्यक्त केला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनअंतर्गत नियम, अटी व शर्ती सर्वत्र सारखेच आहे. काही प्रसंगी नियम शिथील वा कठोर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाड्ढयांना आहेत. मात्र असे असतानाही तालुक्यातील सौंदड येथील सरपंच स्थानिक व बाहेरुन येणार्या भाजी विक्रेत्यांवर वेळ व ठिकाणाबाबत मनर्मजी नियम लावत आहेत. भाजी विक्रीच्या वेळेत वेळोवेळी बदल करण्यात येत असून घरासमोर भाजी दुकान लावण्यासह मज्जाव करण्यात येत आहे. तशी जाहीर सुचना चारचाकी वाहन फिरवून भोंग्याद्वारे देण्यात येत असून, या नियमाचा भंग करणार्यावर ५ हजार रुपये दंड ठोठावण्याचा इशाराही देण्यात येत आहे. या प्रकारामुळे भाजीविक्रेत्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून अनेकांचे दुकाने ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत. विशेष म्हणजे, याच सरपंचाने पहिल्या लॉकडाऊनच्या काळात आठवडी बाजारावर बंदीचे आदेश जिल्हाधिकार्यांनी काढल्यावरही आदेशाला पायदळी तुडवत सामुहिक दुरावा व अन्य उपाययोजना न करताच आठवडी बाजार भरविण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे सरपंच वैयक्तिक द्वेषातून राजकारण करीत असल्याचा आरोपही भाजी विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे. या सर्व प्रकाराला कंटाळून भाजी विक्रेत्यांनी सरपंचाच्या घरावर मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला. तसेच भाजी विक्रेत्याला लावण्यात येणारे नियम अन्य जीवनाश्यक वस्तूंना लावण्यात यावे, अशी मागणी केली