गोंदिया,दि.22ः- देशातील प्रमुख ११ राष्ट्रीय संघटनांनी आज २२ मे रोजी देशव्यापी आंदोलनाची हाक दिली असून या आंदोलनात राज्यातील सर्व कर्मचारी संघटनाही सहभागी होणार आहेत.राज्य मध्यवर्तीच्या संघटनेच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन काळ्या फिती लावून करण्यात येणार असल्याची माहिती राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्रचे सहसचिव आशिष रामटेके यांनी दिली आहे.आंदोलन कामगार कायद्यांना स्थगिती देण्यात येउ नये, केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते कपात करू नये.करोनाच्या नावाखाली केंद्र सरकारने/ राज्य सरकारने खाजगीकरणाला गती देऊ नये, कर्मचाऱ्यांना आरोग्य सुविधा, विमा सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात.सर्व विभागातील ५५ वर्षांवरील तसेच मधुमेह,रक्तदाब आणि दुर्धर आजाराने ग्रस्त आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांना सुट मिळावी.कर्मचाऱ्यांना प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.रिक्त पदे कायम स्वरुपी भरण्याबाबत सरकारने रोड मॅप तयार करावा आणि या भरती मध्ये अनुकंपा तत्त्वावरील भरतीला प्राधान्य द्यावे.आर्थिक सुधारणां करिता विशेषतः महसूल वाढिसाठी मुख्यमंत्र्यांनी मध्यवर्ती संघटनेला तातडीने चर्चला पाचारण करावे या मागण्यांना घेऊन करण्यात येणार आहे.करीता दिवसभर राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन काम करताना अथवा घरी काळ्या फिती लावून काम करावे असे आवाहन करण्यात आले आहे.