जिल्ह्यात साय.7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी लागू

0
783

गोंदिया, दि.22 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदयाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी जिल्ह्याच्या सर्व शहरी व ग्रामीण भागात रात्री 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदीचे आदेश लागू केले आहे. हे आदेश लागू झाल्यानंतर या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणतेही कारणास्तव बाहेर पडण्यास मनाई केली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल. असे या आदेशात नमूद केले आहे.