सनदी लेखापाल यांनी दरपत्रक सादर करण्याचे आवाहन

0
1730

वाशिम, दि. २५ (जिमाका) :  कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात ‘आत्मा’ कार्यालय अंतर्गत नोंदणीकृत इच्छुक शेतकरी गटाचे, शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रकल्प अहवाल बनविण्याकरिता पात्रताधारक सनदी लेखापाल (सीए) यांनी ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत ‘आत्मा’ कार्यालयात दरपत्रक सादर करण्याचे आवाहन ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक एस. एम. तोटावार यांनी केले आहे.

सनदी लेखापाल यांना कमीत कमी ७ ते १० वर्षाचा शासकीय, निमशासकीय कार्यालयांतर्गत शेतकरी गटाचे, शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रकल्प अहवाल बनविण्याचा अनुभव असणे बंधनकारक आहे. सनदी लेखापाल हे वाशिम जिल्ह्याचे रहिवाशी असल्यास प्राधान्य देण्यात येईल. ‘आत्मा’ कार्यालयामध्ये आठवड्यातून एक दिवस काम एक दिवसाचे मानधन देण्यात येईल. तसेच सदर निवड फक्त ११ महिन्यांच्या कालावधीसाठी राहणार असून त्यानंतर आपोआप संपुष्टात येईल. काम समाधानकारक नसल्यास निवड तत्काळ रद्द करण्याचे संपूर्ण अधिकार ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक यांच्याकडे राखून ठेवण्यात आले आहेत. तरी जिल्ह्यातील पात्रताधारक सनदी लेखापालांनी ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत आपले दरपत्रक ‘आत्मा’ कार्यालयात सादर करावे, असे आवाहन श्री. तोटावार यांनी केले आहे.