अर्जुनी मोर,दि.26ः. तालुक्यातील कनेरी ( केशोरी ) येथील तुकाराम दागो गोबाडे (वय 64) शेतकरी केळवद परिसरातील आपल्या शेतीत काम करीत असताना 2 जुलै 2020 ला अंगावर विज पडल्याने मृत्यू झालेला होता.
विज पडुन नैसर्गिक आपत्ती मुळे मृत्यु झाल्याने शासनाचे वतीने तहसिल कार्यालय अर्जुनी मोरचे वतीने आज दि.26 आॅगस्ट रोजी मृतकाची वारस विमल तुकाराम गोबाडे यांना नायब तहसिलदार एम.यु.गेडाम यांचे हस्ते चार लाखाचा धनादेश देण्यात आला.या प्रकरणाची कार्यवाही लिपिक भास्कर भालेराव यांनी पार पाडली.