जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा वर्धापन दिन साजरा

0
1274

गडचिरोली,दि.26 ः-गडचिरोली जिल्हा ३८ वा वर्धापन दिन जिल्हाधिकारी कार्यालयगडचिरोली येथे उत्साहात जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचे अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. यावेळी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनागडचिरोली यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चंद्रपूर जिल्हयाचे विभाजन करुन दिनांक २६ ऑगष्ट १९८२ ला गडचिरोली जिल्हयाची निर्मीती करण्यांत आलीतेंव्हा पासून गडचिरोली जिल्हयातील वरीष्ट अधिकारी यांचे समवेत कर्मचायांनी उत्स्फुर्तपणे कामे करुन आपले योगदान  दिलेले आहे. जिल्हा निर्मीतीला आज ३८ वर्षे पुर्ण झालेले असुन जिल्हयाच्या विकासात्मक कामामध्ये अधिकारी/कर्मचारी यांनी नक्षलग्रस्त आदीवासी बहुल जिल्हयात कर्तव्य निभावलेले आहे. जिल्हयातील सर्व जनतेला व प्रशासनातील प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा यावेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी दिल्या.कोविड१९ या संसर्गजन्य महामारीच्या काळात जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचे मार्गदर्शनाखाली  सर्व  विभागातील राज्य  सरकारी  कर्मचारीमहसुल ,आरोग्यपोलीसजिल्हा परिषद  इतर विभागाचे कर्मचारी  यांचे सहकार्याने कर्तव्य निभावण्यांत येत आहेजिल्हा प्रशासन  राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना,गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने दीपक सिंगलाजिल्हाधिकारीगडचिरोली यांचे हस्ते केक कापून वर्धापन दिन साजरा करण्यांत आलायावेळी जिल्हाधिकारीगडचिरोली यांनी गडचिरोली जिल्हयाच्या विकासात्मक कामाकरीता उपस्थितींना शुभेच्छा दिल्यासदर कार्यक्रमात जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसुळ यांनी केलेल्या जिल्हा प्रसिद्धी विषयक कामाबद्दल प्रशस्तिपत्र अप्पर जिल्हाधिकारी अनंत वालस्कर  यांचे हस्ते प्रदान करण्यांत आले.  कार्यक्रमात धनाजी पाटीलनिवासी उप जिल्हाधिकारीकल्पना निळठुबे उप जिल्हा निवडणूक अधिकारी जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसुळनारायण ठाकरेतहसिलदार, संजीव ओव्हाळमुख्याधिकारी  ..,राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल चडगुलवारसरचिटणीस भास्कर मेश्रामचतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष लतीफ पठाणसचिव किशेार सोनटक्केज्ञानेश्वर ठाकरे, डी.के. निकूरे, दयाराम मेश्रामचहांदे, नरेंद्र भुरलेचांभारे इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.  कार्यक्रमाचे संचालन सुनिल चडगुलवार यांनी केलेतर  आभार सचिन अडसुळ यांनी मानले.