कृषि सहाय्यक प्रशांत भोयर यांचा महिला ग्रामसंघाच्या वतीने निरोप

0
549
मोहाडी,दि.26ः तालुक्यातील कृषी खात्यात आपली सेवा अविरतपणे बजावणारे कृषि सहाय्यक अधिकारी प्रशांत भोयर यांची प्रशासकीय बदली झाल्याने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत डोंगरगाव प्रभागातील टांगा यशस्वी महिला ग्रामसंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
प्रशांत भोयर कृषि सहाय्यक अधिकारी म्हणून प्रामाणिक गेली पाच वर्ष काम पाहिले आहे. भोयर त्या आधी मोहाडी तालुक्यात ग्रामसेवक म्हणून जवळपास तीन वर्ष काम पाहिले आहे. कृषि विभागात काम करण्याची इच्छा असल्यास त्यांनी ती शासकीय नोकरी सोडून कृषि विभागात कार्यरत झाले.
 उन्नती उत्पादक शेतकरी महिला समूहाच्या माध्यमातून कृषी सहाय्यक प्रशांत भोयर यांचे निरोपय सत्कार  करण्यात आले. यामध्ये प्रभाग समन्वयक योगेश गिरी, आयसीआरपी पुष्पा गिरीपुंजे, वर्धिनी वनिता खोब्रागडे, ग्राम संघाचे लीपिका आशा गिरेपुंजे, विद्या गिरीपुंजे, उषा गिरीपुंजे, सुनंदा बोंद्रे, सुनंदा टिचकुले, निशा लुटे, सुनिता बांदे, अमिता गिरीपुंजे आदी उपस्थित होते.
कृषि सहाय्यक प्रशांत भोयर यांनी उत्पादक गटातील २५ महिलांना शाश्वत उपजीविका अंतर्गत श्री पद्धतीने धान लागवड संदर्भात मोफत वाटप करून संपूर्ण महिलांना शाश्वत शेतीकडे वळविले.  शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन व सराव गावांमध्ये महिलांकडून करून घेतल्या वेगवेगळे शेती शाळांमध्ये महिलांना प्रात्यक्षिक च्या स्वरूपांत धानावर येणारे रोग नियंत्रण  ओळखणे त्यावर कुठल्या सेंद्रिय खताची फवारणी कोणत्या वेळेत करावे. अशी वेगवेगळी अनमोल मार्गदर्शन करून महिला सक्षमीकरण मोलाची भूमिका बजावली. सरांच्या प्रशासकीय बदलीमुळे एक पोकळी निर्माण झालेल्या. मटका सत्कार निरोप समारंभ भाषणामध्ये प्रशांत भोयर म्हणाले जरी माझी बदली असेल तरीसुद्धा माझे मार्गदर्शन हे तुमच्यासाठी असणार आहे.
निरोप देते वेळी मनोगत व्यक्त करतांना समन्वयक योगेश गिरी यांनी त्यांच्या कार्यला उजाळा देताना सांगितले की,पुन्हा कृषि सहाय्यक मिळणे शक्य नाही, त्यांनी सर्वाना सोबत घेऊन काम केले आहे. शेतकरी वर्गाची चांगलीच सेवा केली. त्यांनतर नितीन लिल्हारे यांनी सांगितले की, कामाची पद्धत ही नम्र होती, आणि कामात कोणत्याही प्रकारचा दुजाभाव केला नाही. शेवटच्या घटका पर्यंत योजना पोहचविल्या. त्यांच्या उत्कृष्ट कार्यला सलाम केला.त्यांना पूढील वाटचालीसाठी शुभेच्छा ही यावेळी देण्यात आल्या.